पवारांच्या मनात काय...?

Sharad Pawars Political game.resignation as NCP suprimo

A P

5/4/20231 min read

नुकतेच पार पडलेल्या शरद पवार यांचे पुस्तक  लोक माझे सांगाती च्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी निवृतीची घोषणा केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महानाट्य घडताना दिसत आहे.

ह्या नाट्याचे काय परिणाम भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात होतील,तसेच त्या मागे पवारांची काही खेळी तर नाही असे वेगवेगळे तर्क वितर्क सामान्य तसेच राजकीय अभ्यासक लावत आहेत.ह्या सगळ्या तर्क वितर्क शंका कुशंका च्या मागे तशी पार्श्वभूमी आहे.अजित पवारांच्या भाजपात जाणाऱ्या बातम्या आणि त्यातून महाविकास आघाडीत होणारी चल बीचल.त्यामुळे अजित पवारांनी कोणतेही अशी भूमिका घेऊ नये की त्याने महाविकस आघाडीला तडा जाईल आणि त्यांना कोंडीत पकडता येईल .

कारण असा निवृत्तीसारखा मोठा निर्णय जर पवारांनी घेतला तर तो नक्कीच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विचारात घेऊन घेणे अपेक्षित आहे. त्याउलट पवारांनी ऐन पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृतीच्या घोषणा केली आणि साहजिकच तेथे जमलेल्या नेते , कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येणारच होत्या. त्यामुळे पक्षातील आपल महत्व आणि पूर्ण पक्ष हा अजूनही आपल्याच हाती आहे हे पवारांनी दाखवून दिलं. आणि एक प्रकारे राष्ट्रवादी पक्षातील फूट पडू नये, तसेच महाविकास आघाडी टिकून राहण्यासाठी , आणि देशपातळीवर भाजपा विरोधात सर्वपक्षीय नेत्याना एकत्र आण्याची क्षमता आपल्यातच आहे असा संदेश जाण्यासाठी हा डाव पवारांनी खेळला असावा आणि एक तिराने अनेक पक्षी  साधले असावे. हे सर्व होत असताना आपण केवळ तर्क लावू शकतो कारण पवार हे नेहमी एक पत्ता राखून डाव खेळणारे खेळाडू आहे.

त्यामुळे शरद पवार यांच्या मनात काय आहे ह्याचा अंदाज आजपर्यंत तरी अचूक पणे कोणताही नेता, पत्रकार किंवा राजकीय अभ्यासक लावू शकला नाही.