का वाढत आहे एवढी महागाई?
Why is inflation increasing so much in india?Reasons behind inflation in india.
5/12/20231 min read


गेल्या काही महिन्यांपासून दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या जवळपास साऱ्या वस्तूंच्या किमती ह्या वाढत जात आहे.
मग त्यात डाळी, असो दूध असो किंवा भाजीपाला असोएवढंच काय मनोरंजन असो की प्रवास सर्व काही महाग झाले
आणि सर्वसामान्याच्या सर्वात खिसा कापणारी वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर.त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय यांचे बजेट कोलमडून गेले आहे.
तर ह्या एवढ्या महागाईचे कारण तरी काय आहे.
तर मित्रानो याला एक नाही वेगवेगळी अनेक कारणे आहे ती काय ते आपण बघुयात
१. लॉक डाऊन - लॉक डाऊन मुळे जितकी ही आयात निर्यात होत असे ती बंद झाली त्याचा परिणाम उद्योंगावर झाला. उद्योग बंद पडून त्या वस्तूंचा निर्माण बंद झाले व त्या वस्तूंची टंचाई निर्माण होऊन त्यांच्या किमती ह्या उच्च पातळीवर जाऊन ठेपल्या.
२. आर.बी. आय. ची पतधोरण
जेव्हा कधीही बाजारात मंदी असते तेव्हा आर.बी. आय.व्याजदर कमी करते .त्यामुळे लोक जास्त कर्ज घेतात आणि खर्च करतात त्यामुळे मंदी कमी होते आणि महागाई वाढत जाते आणि ही जी थोडी फार महागाई आहे ती हेल्थी महागाई असते आणि ती कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी गरजेची असते.व याच अनुषंगाने लॉकडाऊन मुळे बाजारात आलेल्या मंदी ला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले त्यामुळे मंदी तर कमी झाली परंतु लॉकडाऊन संपल्यानंतरही रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले नाही व लोक खर्च करणे सुरू राहिले व वस्तूंच्या किमती वाढत गेल्या.
३.रशिया - युक्रेन युद्ध
रशिया हा कच्च तेल निर्यात करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.
व या युद्धामुळे कच्च तेलाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या. आणि जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा तेव्हा इतर सर्व वस्तूंच्या किमती वाढतात.
त्यामुळे महागाई वाढ होण्यासाठी हे युद्ध देखील कारणीभूत आहे.