चोंडी मुखेड व धामणे महाराष्ट्राने चोहोबाजूंनी वेढलेली कर्नाटकातील दोन गावे(Karnatak Occupied Maharashtra)

Chondi Mukhed and Dhamane vilages of karnataka state are completelly surrounded by Maharashtra states. They are exclaves of karnataka.

5/10/2023

चोंडी मुखेड हे कर्नाटकातील असे गाव आहे जे महाराष्ट्राने चोहोबाजूंनी वेढलेले

चोंडी मुखेडची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 1,617 होती आणि नुकत्याच झालेल्या इतर सर्वेक्षणानुसार ती 3,200 पर्यंत वाढली आहे.

90 टक्के लोकसंख्या मराठी बोलते .

गावाला कोणत्याही पायाभूत सुविधा द्यायच्या असतील तर त्या महाराष्ट्र राज्यातूनच द्याव्या लागतात .

इथे कर्नाटक प्रशासन भाषिक आक्रमण करण्यासाठी कन्नड शिक्षक पाठवतात तर तो शिक्षकच मराठी शिकून परत कर्नाटकात जातो .

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे इथे अपयश ठळकपणे दिसून येते .कर्नाटकची जवळची गॅस एजेन्सी येथून सुमारे ५० कमी दूर आहे .त्यामुळे येते आजही चुलींवर स्वयंपाक केला जातो .

आरोग्य सेवाही पुरविण्यास कर्नाटक सरकारास अपयश आलेले आहे .नागरिकांना उपचारांसाठी महाराष्ट्रातील उदगीर किंवा मुक्रमा बाद ला यावे लागते

उच्च शिक्षणासाठी मुले उदगीर तालुका , जिल्हा लातूर इथे येतात .बहुतांश शेतकऱ्यांच्या शेती ह्या महाराष्ट्रातच येतात .पण सर्व प्रशासकीय काम हे कर्नाटकातून चालते .त्यामुळे भरपूर अडचणी येतात .

इतके वर्ष चोंडी मुखेड वास्तविक पाहता महाराष्ट्रातच असणे योग्य असतांना ह्या गंभीर विषयावर कोणी आवाज का उठवला नाही हे आश्चर्यकारक आहे

धामणे

धामणे हे गाव भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव तालुक्यात आहे.

चोंडी मुखेड प्रमाणे धामणे हेही गाव कर्नाटकातील असे गाव आहे जे महाराष्ट्राने चोहोबाजूंनी वेढलेले आहे .

धामणे एस बेळगावची एकूण लोकसंख्या 7,341 आहे, त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या 3,755 आहे तर महिलांची लोकसंख्या 3,586 आहे.

धामणे यांच्या बेळगाव गावाचा साक्षरता दर 67.50% असून त्यापैकी 75.02% पुरुष आणि 59.62% महिला साक्षर आहेत. धामणे यांच्या गावात सुमारे 1,496 घरे आहेत.