भारत बनला तेल निर्यात करणारा देश
A P


भारत बनला तेल निर्यात करणारा देश
आश्चर्य वाटलं ना?
तर हो...
मित्रांनो भारत हा खरंच युरोप ला तेल निर्यात करणारा देश बनला आहे.
त्याच झालं अस की रशिया ने युक्रेन शी युद्ध थांबवाव या साठी युरोप ने रशिया कडून तेल आयात करणे बंद केले आहे.आणि युरोपात त्यामुळे तेलाची टंचाई निर्माण झाली आहे.आणि भारताने ही रशिया कडून तेल आयात करू नये अशी विनंती युरोप ने भारताला केली.
याउलट भारताने युद्ध सुरू असल्यापासून रशिया कडून पूर्वीपेक्षा अधिक तेल आयात करणे सुरू केले आहे .
कारण आता टंचाई मुळे स्वतः युरोप च भारताकडून तेल आयात करत आहे. टंचाई चा फटका सरळ त्यांच्या उद्योगावर म्हणजेच त्यांच्या अर्थव्यवस्थेवर बसत आहे.
त्यामुळे अप्रत्यक्षरित्या युरोप हे भारताद्वारे रशियाकडून च तेल आयात करत आहे.
आणि जर ही आयात अशीच चालू राहिली तर पुढील काही महिन्यांत भारत हा सौदी पेक्षाही मोठा निर्यातक देश बनेल.