शिंदे आऊट पण ठाकरेंचा नो बॉल
Supreme Court Verdict On Shivsena Case
5/11/20231 min read


आज झालेल्या सुनावणीमध्ये अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ह्यांच्यांवर ताशेरे ओढले.
आजच्या निर्णयातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे
1.राज्यपालांचे सर्व निर्णय बेकायदेशीर होते
2.शिंदे गटाचे प्रतोद भारत गोगावले हे बेकायदेशीर
3.ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू हे वैध प्रतोद
3.१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील
4.ठाकरेंनी राजीनामा दिल्या मुळॆ आम्ही त्यांचे सरकार परत आणू शकत नाही अन्यथा ते आम्ही पुन्हा प्रस्थापित केले असते.
नैतिक दृष्ट्या शिंदे सरकार हरलेले आहे ,त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे मविआ चे म्हणणे आहे ...
शेवटी ठाकरेंचा राजीनामा हि गोष्ट Game Changer ठरली .आम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरवू शकत नाही व ठाकरेंच्या राजीनाम्याच्या निर्णयात आम्ही काही करू शकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे .
जर सुनील प्रभू हे प्रतोद म्हणून मान्य केले गेले आहेत ह्याचा असाही अर्थ निघतो कि १६ आमदार अपात्र आहे .
मात्र त्यासाठी तीव्र पाठपुरावा व राजकीय हालचाली ठाकरे गटास कराव्या लागतील .
सध्या तरी चेंडू राहुल नार्वेकरांच्या कोर्ट मध्ये आहे .बघूया काय होते ते ...



