राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुप्रिया सुळे का ठरतात वरचढ
Supriya Sule New NCP Suprimo? राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुप्रिया सुळे का ठरतात वरचढ
A P
5/4/20231 min read


शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सगळीकडे एकच चर्चा दिसतीये ती म्हणजे शरद पवार यांच्या नंतर कोण
खर तर अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत अनेक दिग्गज दावेदार आहेत.
त्यात अजित पवार ,सुप्रिया सुळे,जयंत पाटील ,प्रफुल्ल पटेल , दिलीप वळसे पाटील अशी मोठी नावे पुढे येतात . पण या सर्व नावांमध्ये सुप्रिया सुळे सर्वात वरचढ ठरतात .
त्याच सर्वात मोठ कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवर त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव.
अजित पवार कामाचा झपाटा लावणारे नेते आहे.तसेच त्यांचा प्रशासनावर उत्तम नियंत्रण ठेवणारा नेता म्हणून ओळख राहिली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वतःच्याच काय तर इतर ही पक्षातील आमदारांशी थेट संपर्क असलेला नेता म्हणून ओळख आहे . परंतु जेव्हा अध्यक्षपदाचा विचार होतो त्यावेळेस ते काही मागे पडताना दिसतात कारण त्यांना पक्षाध्यक्ष केलं तर राष्ट्रीय पातळीवर त्यांचा एवढा संपर्क नाही . व पक्ष राष्ट्रीय पातळीवर वाढवण्यासाठी अजित पवारांचं नेतृत्व पूरक वाटत नाही.
जयंत पाटील ही राज्याच्या पातळीवर एक राष्ट्रवादीमधील मोठ नाव शांत , सयंमी परंतु त्यांनाही ही राष्ट्रीय पातळीवर कोणताही अनुभव नाही आणि इतर नेत्यांनाही तशाच मर्यादा लागू पडतात.
राष्ट्रीय पातळीवर राजकारणाची समज सुप्रिया सुळेंना आहे.
सतरा वर्षांचा संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव तसेच उत्तम संसद पटू म्हणून त्यांना अनेकदा गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे एक अभ्यासू नेत्या म्हणून त्यांची ओळख मागील काही वर्षात राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.
आणि देशातील इतर राज्यातील नेत्यांसह त्यांचे उत्तम संबंध आहे.
ह्या सर्व बाबींमुळे राष्ट्रवादी पक्षाला जर राष्ट्रीय पातळीवर वाढ करायची असेल तर सध्यातरी सुप्रिया सुळेच ह्या सक्षम दिसतात. तसेच अजित पवार आणि जयंत पाटील यांचे संबंध सर्वांना माहीत आहे त्यामुळे एकाला अध्यक्ष केलं तर दुसऱ्यावर अन्याय अशा धर्मसंकटात पडू नये म्हणून सुप्रिया सुळे ह्यांचं नाव अगदीच योग्य ठरतं कारण त्यांचे अजित दादा आणि जयंतराव दोघांशी ही उत्तम सुर जुळतात त्यामुळे ह्या दोघांतील दुवा म्हणून ही त्यांची भूमिका राहील.
ह्या सर्व बाबींमुळे राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळेंचं नाव सर्वाधिक वरचढ ठरते.