समृद्धी महामार्गा वरील अपघात संमोहनामुळे
समृद्धी महामार्गा वरील अपघात संमोहनामुळे
P T
5/3/20231 min read


समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सुरळीत झाला आहे. मात्र, पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाल्यापासून नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या समृद्धी महामार्गावर शेकडो अपघात झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या अपघातांच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. (अपघाताची बातमी) सुरुवातीला समृद्धी महामार्गावर वाहनांचा अतिवेग हे अपघाताचे कारण असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले. आता एक नवीन कारण समोर आले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीएनआयटी) परिवहन विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी तीन महिने अभ्यास केला. या अभ्यासातून सर्वाधिक अपघात हे संमोहनामुळे होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या विद्यार्थ्यांनी महामार्गावरील 100 किमी परिसरात हा अभ्यास केला.
हायवे अडथळ्यांशिवाय सरळ आहे, तुमची गाडीही एका दिशेने धावते. यामध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर असते, तुमचा मेंदूही सक्रिय नसतो. या अवस्थेला महामार्ग संमोहन म्हणतात. संमोहनामुळे अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. एकूण अपघातांपैकी ३३ टक्के अपघात हे महामार्गावरील संमोहनामुळे होतात.