What is Sengol-सेंगोल सत्ता हस्तांतराचे प्रतीक
Sengol Meaning
5/25/20231 min read


भारताच्या नव्या संसद भवनाच्या उदघाटनावरून राजकीय लढाई सुरू आहे. केंद्र सरकार हा सोहळा भव्यदिव्य करण्यात गुंतले असले तरी विरोधी पक्ष या उद्घाटन सोहळ्याला विरोध करत आहेत.
भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उदघाटन व्हावे हि विरोधकांची मागणी आहे
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे आणि त्यादरम्यान 'सेंगोल' बसवले जाईल.
सेंगोल हे भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित एक महत्त्वाचे ऐतिहासिक प्रतीक आहे. जेव्हा ब्रिटिशांनी भारताचे स्वातंत्र्य घोषित केले, तेव्हा सेंगोलचा वापर सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून केला गेला. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी नेहरूंना 1947 मध्ये सत्ता हस्तांतरणासंदर्भात एक प्रश्न विचारला, सत्ता हस्तांतरित कशी करावी.
यानंतर नेहरूंनी सी. राजा गोपालाचारी यांचे मत घेतले. त्यांनी जवाहरलाल नेहरूंना सेंगोलबद्दल माहिती दिली. यानंतर सेंगोल तामिळनाडूतून एका प्रसिद्ध सोनाराकडून(Jewelrs Shop) बनविण्यात आले .
'सेंगोल' चा अर्थ काय आहे?
सेंगोलचे नाव तमिळ शब्द 'सेम्मई' वरून पडले आहे, ज्याचा अर्थ आहे सत्यपणा ,नैतिकता .
चोल घराण्याशी काय संबंध?
सेंगोलचा इतिहास शतकानुशतके जुना आहे, तो चोल साम्राज्याशी संबंधित आहे.
इतिहासकारांच्या मते, राजदंड सेंगोलचा वापर चोल साम्राज्यात सत्ता हस्तांतरणासाठी करण्यात आला होता.
त्या काळात, जेव्हा सत्ता हस्तांतर होई तेव्हा ती जुन्या राजाकडून नव्या राजाकडे सेंगोल देऊन होत असे .हि परंपरा शतकानुशतके चालत आली .
त्यामुळे रक्त पात न होता शांततेने सत्ता हस्तांतर होई .
आणि एवढे मोठे चोल साम्राज्य ज्याचा विस्तार आहे दक्षिण भारतापासून सिंगापूर ,म्यानमार ,इंडोनेशिया ,कंबोडिया ह्या देशांपर्यंत होता तेथे शांततेने सत्ता हस्तांतर होई ..