WMO संस्थापक प्रवीण पिसाळ

Pravin Pisal Information

5/22/20231 min read

WMO-PARVIN PISAL INFORMATION
WMO-PARVIN PISAL INFORMATION

भारतात एक चुकीची प्रथा आहे कि माणूस जिवंत असतांना त्याचे महत्व न ओळखणे .

असेच एक मोठे व्यक्तिमत्व आपणास सोडून गेले आहे .मराठा प्रवीण पोपटराव पिसाळ

World Maratha Organization ची स्थापना करणारे प्रवीण पिसाळ ह्यांनी आपल्या नावापुढे मराठा लावले होते .पण ह्यातून ते कट्टरता नवे तर जोडण्याची वृत्ती दाखवू इच्छित होते .

प्रवीण पिसाळ यांनी अतिशय तरुण वयात 2013 साली आपली ही चळवळ सुरु केली होती.

World Maratha Organization ची स्थापना केली होती, या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना रोजगारासाठी मार्गदर्शन आणि मदत देखील केली होती.

तरुणांना रोजगार मिळवून देण्यात, व्यवसायाला बळ देण्यास प्रवीण पिसाळ आघाडीवर होते. WMO सोबत ऑनलाईन खास करुन फेसबूकवर एक कोटी मराठा जोडले गेले होते, त्यातून त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम सुरु केलं होतं.

महत्त्वाचं म्हणजे, कोरोना काळात सर्वाधिक कार्यशील आणि हजारो लोकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आघाडीवर होते. यामागे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

2008 पासून मराठा समाजास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला होता, पुढे WMO हा फेसबूकवर 1 कोटीच्याही पुढे गेला.

मराठा हॉस्टेल ही प्रवीण पिसाळ यांची कल्पना मात्र अजून तरी पूर्णत्वास आली नाही.

प्रवीण पिसाळ उद्योजकांसाठी व तरुणांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतील .